जळगाव,

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेड काढण्यात आली आहे होती. याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. केतन जयदेव ढाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीमध्ये भरलेल्या मुक्ताई यात्रेत हा प्रकार घडला आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची टवाळखोरांनी छेड काढली होती. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले असून महिला सुरक्षेचा प्रश्न आता चव्हाट्यावर आलाय. त्यातच स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्याची मुलीची अशापद्धतीने छेड काढली जात असेल तर राज्यातील सामान्य महिलांचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून प्रचंड वातावरण तापले होते.
28 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणात एकूण सात जणांवर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर अनिकेत भोई या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र कायदा अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती आणि मोबदला) नियम, १९८४ च्या नियम ४४ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो कायदा, २०१२) च्या कलम ३२ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र सरकार याद्वारे अधिवक्ता केतन जयदेव ढाके यांची भुसावळ, जिल्हा जळगाव येथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर प्रलंबित असलेले खटले चालवण्यासाठी “विशेष सरकारी वकील” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


