महिला पर्यावरण मंच भुसावळ तर्फे’ प्लेट बँक ‘ हा एक अनोखा व स्तुत्य उपक्रम सुरू :

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्लॅस्टिक प्लेट ग्लास , डिश याच्या वापरामुळे (मायक्रो प्लस्टिक) रासायनिक घटक पोटात जाऊन आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो , प्लॅस्टिक वापरामुळे शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी निसर्ग व पर्यावरण समतोल साधन्यासाठी येथील महिला पर्यावरण मंच भुसावळ तर्फे’ प्लेट बँक ‘ हा एक अनोखा व स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे . यामुळे बहुतांशी प्लॅस्टिक वापरावर आळा बसून पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल असा विश्वास मंच अध्यक्षा शालिनी वाढेकर यांनी व्यक्त केला आहे .

स्थानिक संतोषी माता हॉल नजीक पर्यावरण सखी मंजू सुरळकर यांचे निवासस्थानी प्लेट बँकेचे उद्घाटन करण्यात आले . प्लेट बँक मध्ये उपलब्ध भांडी प्लॅस्टिक विरहित असल्याने आरोग्य सुदृढ व उत्तम राहते , पर्यावरणातील कचरा कमी होण्यास मदत होईल , वायू प्रदूषण होणार नाही तसेच जमिन नापीक होणार नाही . प्लॅस्टिक प्लेट मध्ये गरम पदार्थ वाढल्याने मायक्रो प्लास्टिकचे घटक पदार्थात मिसळतात व या वापरामुळे शरीरावर परिणाम होऊन आरोग्यास धोका निर्माण होतो , पर्यावरणात भरमसाठ कचरा होतो प्लॅस्टिक प्लेट मधील अन्न खातांना प्राण्याचे पोटात प्लॅस्टिक जाऊन त्या मूक प्राण्यावर मृत्यू ओढवतो . हे सर्व टाळण्यासाठी ही प्लेट बँक सुरू केली आहे .

या मंच च्या वतीने काही स्टील भांडी वाढदिवस , किटी पार्टी व इतर कोणत्याही समारंभात वापरण्यासाठी अत्यंत माफक अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे . यासाठी प्लेट बँक प्रतिनिधी शालिनी वाढेकर शांती नगर, 8378088889/ 9423722002 सोनाली राणेतापी नगर 7028923021 व शितल अरोरा 7757006133 गायत्री शक्ती पीठ जवळ भुसावळ येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 .यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

पर्यावरण मैत्रिणींनी स्वतःचे पैसे वापरून प्लेटस खरेदी केल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर ऍड मध्ये दिलेला आहे प्लेट बँकेसाठी.. दोन रुपये प्रति प्लेट भाडं आहे. कितीही प्लेट्स मागवू शकता. प्लेट स्वच्छ धुऊन, कोरड्या करून प्लेट बँक प्रतिनिधीला परत करायच्या आहेत. यावेळी पर्यावरण सखी शालिनी वाढेकर , सुनंदा औंधकर , शितल अरोरा, मंजू सुरळकर , वैशाली सैतवाल , सोनाली राणे, भारती फडणीस , लिपिका राऊत , अनिता कुलकर्णी , जयश्री इंगळे , वंदना बाविस्कर , उषा काथार , हेमांगी सूर्यवंशी , मनीषा टोपरे ,अंजली उघडे , अर्चना घुले , नयना देशमाने , नीलिमा समंदर ,सर्वच सपकाळे ,व रश्मी जैन , शिप्रा विश्वास , तेजल चौधरी , तानिया बिरारी , माधुरी चौधरी ,व हर्षा चौधरी , मेघा कांबळे , सुनिता चौधरी प्रतिभा गायकवाड आदी उपस्थित होत्या.