‘

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे दि.२० राेजी साज-या हाेणा-या श्री संत गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रगट दिनानिमित्त बहुसंख्य गजानन भक्तांच्या उपस्थितीत साेमवार रोजी ‘गण गण गणात बाेते’ च्या गजरात पालखी काढण्यात आली.
संध्याकाळी ५ वाजता अष्टभुजा देवी मंदिरापासून पालखी साेहळ्यास प्रारंभ हाेत पांडुरंग टाॅकीज, अमर स्टाेअर्स, गांधी चाैक, मरीमाता मंदिर, ब्राम्हण संघ, आनंद नगर, नाहाटा काॅलेज या मार्गावर गजानन भक्त पालखीचे दर्शन घेत हाेते, तद्नंतर गजानन महाराज मंदिर देवस्थान जामनेर रोड येथे रात्री ९ वाजता गजानन महाराजांची आरती करून पालखीची सांगता करण्यात आली.



