नरवेलला लग्नाच्या वरातीत वाद घालत लूट : चौकडी मुक्ताईनगर पोलिसांच्या जाळ्यात –

मुक्ताईनगर – लग्नाचे आमंत्रण नसतानाही वरातीत सहभाग होत तरुणाला मारहाण करीत तीन हजार 700 रुपये लूटल्याप्रकरणी चौकडीला मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे.
निवृत्ती शामराव पाटील (51, नरवेल, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नरवेल येथील घनश्याम कोळी यांच्या घरासमोर लग्नाच्या वरातीत संशयीत चेतन सुनील जिरी याने हातातील फायटरने पवन सुनील घाटे यास मारहाण केली तसेच साक्षीदाराला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत हातपाय तोडण्याची धमकी देत नंतर दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी अजय उर्फ अनिल स्वप्नील वानखेडे, चेतन सुनील जिरी, अजय गजानन बेलदार, शुभम सुनील जिरी, राहुल कोरकू (अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.