पुणे,

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर आलीय. अजित पवार रविवारी नाशिक दौऱ्यावर गेले होते. त्यांनी आमदार सरोज आहेर यांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खराब झाली. त्यामुळे त्यांनी नाशिक दौरा मध्येच सोडून नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले. यानंतर ते ओझरवरून पुण्याला रवाना झाले.
आजही अजित पवारांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार सोमवारी सकाळी मुंबईला रवाना झाले आहेत.
रविवारी नाशिकमध्ये केलेल्या भाषणात अजित पवार यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. आताच आपण दोन गोळ्या घेतल्या आहेत, तरीही मला बरं वाटत नाहीये. मी जास्त बोलणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करत पुण्याला आले होते. मात्र रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना अजून बरं वाटत नाहीये. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यानंतर ते मुंबईला रवाना झाले आहे. मुंबईतल्या निवासस्थानी ते आराम करू शकतात.


