महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे सॅलेड डेकोरशन स्पर्धा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे “सॅलेड खा निरोगी रहा..” यावर आधारित फळांची व भाज्यांची सॅलेड स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत प्रथम सुषमा भारंबे , द्वितीय अलका ढाके
तृतीय मृणाल सोनार यांनी पारितोषिक पटकावले .
जामनेर रोड येथील चौधरी हॉल येथे ही स्पर्धा संपन्न झाली . यावेळी भुसावळ परीसरातील महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नाहटा काँलेजच्या वनस्पतीशास्त्राच्या प्रा. विद्या पाटील उपस्थित होत्या. त्यांनी स्त्रियांच्या आरोग्यातील आहाराचे महत्त्व अत्यंत मार्मिक शब्दात समजावून सांगितले आपल्याला निसर्ग भरभरून देतो पण जंकफुडच्या काळात व स्पर्धेच्या युगात आपण हे सर्व विसरलो गावरान मेवा तसेच हिरव्या पालेभाज्या व रान भाज्यांचे महत्त्व सुध्दा महिलांना रीतीने सांगितले.
आपल्या प्रस्ताविकेत अध्यक्षा आरती चौधरी यांनी प्रत्येक महिलेत कलागुण असतात, आणि स्वयंपाक करणे ही सुद्धा एक कला आहे या पाककलेच्या माध्यममातून महिला व्यक्त होत असतात म्हणून स्वयंपाक घर महिलांची आवडीची, हक्काची जागा असते, त्यामुळे आजही वेगवेगळे नवनवीन पदार्थ करून कुटुंबातील लोकांना निरोगी व आनंदी ठेवावे असे प्रत्येक महिलेला वाटते पण आहारासोबत जीवनसत्वयुक्त भाजीपाला योग्य आकर्षक रीतीने मांडल्यास सर्व आनंदाने खातील , कुटुंब निरोगी राहिल याची जबाबदारी महिलेची गृहिणीची असते आणि ही जबाबदारी ओळखून या मुख्य उद्देशाने स्पर्धा घेण्यात आल्या .
परिक्षक म्हणून ज्योती राठोड यांनी काम केले.
प्रत्येक मांडणीची बारकाईने पहाणी करून छोट्या छोट्या टीप्स, बारकावे स्पर्धकांना सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकल्प प्रमुख विजया निकम यांनी केले.
सचिव लता होसकोटे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
आभार जयश्री ओक यांनी मानले
पाहुण्यांची ओळख स्वाती नाईक यांनी केली.
महिला क्रिडा मंडळाचे सदस्य दिपाली सराफ, मंगला पाटील, प्रमीला नेमाडे, अनिता कवडीवाले स्पर्धकांच्या व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली.
विनीता नेवे, प्राची राणे, प्रभा पाटील, राजेश्री कात्यायनी यांनी बक्षिस समारंभाची व्यवस्था बघीतली.
स्पर्धेतील विजेत्या …
प्रथम सुषमा भारंबे
द्वितीय अलका ढाके
तृतीय मृणाल सोनार
उत्तेजनार्थ प्रथम- रेखाताई बटले
दुसरे – पल्लवी ढाके तिसरे-लिपिक राऊत
टॅलेंटेड सहभाग..
भावना पिंगळे
दर्शना पाटील
मनीषा सिंग
नंदा पांडव
प्रीती पिंगळे
सारिका भावसार
श्रद्धा महाले
सुनीता बेंडाळे
सुनिता सिंग
प्रतीक्षा नेवे