जम्मू तवी स्टेशनवरील कामामुळे पुणे-जम्मू तवी एक्सप्रेस तात्पुरती रद्द

भुसावळ ,- उत्तर रेल्वेतील जम्मू तवी स्टेशनवर पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शनसंदर्भातील नॉन-इंटरलॉकिंग (NI) कार्य सुरू असल्याने, भुसावळ विभागातून जाणाऱ्या खालील गाडी तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात येणार आहे –

गाडी क्रमांक 11077 –पुणे ते जम्मूतवी एक्सप्रेस, दिनांक 17.02.2025 ते 04.03.2025 या कालावधीत रद्द राहील.

गाडी क्रमांक 11078 –जम्मूतवी ते पुणे एक्सप्रेस, दिनांक 19.02.2025 ते 06.03.2025 या कालावधीत रद्द राहील.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की त्यांनी या अवसंरचना सुधारणा कार्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी संबंधित रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.