कुंभ मेळ्यावरून परतणार्‍या भाविकांच्या वाहनाला अपघात : चौघै ठार ;

नांदेड – : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात होवून या घटनेत चार भाविकांचा मृत्यू ओढवला तर अन्य 19 जण जखमी झाले. मयतांमध्ये नांदेड येथील तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश आहे
नांदेड येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने 23 जण रवाना झाले.. महाकुंभ मेळ्यात स्नान करून हे सर्व भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने अयोध्येकडे निघाले होते. रविवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्सवर भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर जावून धडकली. या भीषण अपघातात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला.

या अपघातात नांदेडमधील सुनील दिगंबर वरपडे (50), अनुसया दिगंबर वरपडे (80), दीपक गणेश गोदले (40) आणि हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुवा येथील जयश्री पुंडलिकराव चव्हाण (50) यांचा मृत्यू ओढवला तर जखमी 19 भाविकांना लखनौ येथील गोसाईगंज येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.