मुक्ताईनगर – श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे आज संस्थान मार्फत “संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र महतनगर पंचक्रोशी परिक्रमा” चे दरवर्षी प्रमाणे माघ महिन्यातील शुद्ध प्रतिपदा, धर्मनाथबीज पावनपर्वावर दि.३० जानेवारी ते १ फ्रेबुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असून, प्रस्थान कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सहभागी होऊन दर्शन घेतले.

यावेळी कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील व आमदार श्री.चंद्रकांत पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे व व्यवस्थापक ह.भ.प.उद्धव महाराज जुणारे हे प्रमुख उपस्थितीत होते.


