भुसावळ – माणूस घर बांधू शकतो परंतु घराला घरपण स्त्रीच देते, त्यामुळे स्त्रियांचा व्यक्तिमत्व विकास होणे महत्त्वाचेआहे असे मत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्री हारून उस्मानी यांनी व्यक्त केले .
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नाहाटा महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग , तथा महिला तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
युवती सभेचे आज नाहाटा महाविद्यालयात उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शायर श्री हारूण उस्मानी होते. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही.ए.सोळुंके, महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष डॉ. विद्या पाटील हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. ए. सोळुंके यांनी केले.

तर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्री हारून उस्मानी यांनी “महिलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा पाया हा महाविद्यालयीन जीवनात घातला जात असतो. महिलांच्या सर्वांगीण विकासावरच समाजाचा, देशाचा विकास अवलंबून असतो, हे सांगताना प्रेम ,संयम, संस्कार आणि अध्यात्म यातून एक सहृदय व्यक्ती तयार होत असते असे मत त्यांनी नमूद केले. घरे, बंगले माणूस बांधू शकतो परंतु त्या घरांना घरपण देण्याचे काम एक सुशिक्षित सहृदय स्त्रीच करू शकते असे मत त्यांनी नमूद केले. म्हणूनच चांगला व्यक्ती बनण्यासाठी विद्यार्थिनींनी रोज अध्यात्माशी निगडित एक पान तरी वाचन करावे” असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी डॉ. विद्या पाटील यांनी “विद्यार्थिनींनी वाचन करणे आई-वडिलांना मदत करणे, त्यांना वेळ देणे यातून संस्कार रुजतात” असे मत प्रतिपादित केले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. एस. व्ही. पाटील यांनी विद्यार्थिनींनी सद्गुण आत्मसात करण्यासाठी मुद्दामहून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.जागृती डांबरे हिने केले.पाहुण्यांचा परिचय कु. प्रांजल बारी हिने दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.संध्या वराडे हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संगीता भिरुड,डॉ. ममताबेन पाटील, डॉ. स्मिता चौधरी, डॉ. एस. के. राठोड, तसेच विद्यार्थी
शिवाजी बिजागरे, कु.साक्षी जैन, कु.शारदा मराठे, कु.पायल बारी यांनी परिश्रम घेतले.


