भाजपा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसेच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न ;

मुक्ताईनगरभाजपा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र यांची भाजपा सदस्य नोंदणी अभियान व आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक बाबत येथील गोदावरी मंगल कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री .ना.श्रीमती रक्षाताई खडसे, डॉ.राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख .नंदकिशोर महाजन, मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख .अशोक कांडेलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आढावा बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करून सदस्य नोंदणी अभियान व बुथ सशक्तीकरण संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करणे बाबत सूचना देऊन, भाजपा पदाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रातील आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक बाबत राजकीय स्थिती जाणून घेतली.