पालिकेची धडक कारवाई ; भुसावळात इंडस मोबाईल टॉवरला सील ; 11 लाखाचा कर थकीत ;

भुसावळ – 11 लाख रुपयांचा थकीत कर न भरल्याने भुसावळ नगरपरिषद वसुली पथकाने वसुली करीता आज धडक कारवाई करून इंडस मोबाईल टॉवरला सील केले आहे .पालिकेच्या या कारवाईमुळे थकबाकी धारकांमध्ये खळबळ उडाली आहे .

दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी शनी मंदिर वार्ड वसुली भाग क्रमांक 5 येथे इंडस मोबाईल टॉवर चे मालमत्ता कराची रक्कम रुपये 11 लाख मात्र थकीत असल्याने ती रक्कम न भरल्याने टॉवर सील करण्यात आले .या कारवाईत उपमुख्य अधिकारी शेख परवेज अहमद, प्रशासकीय अधिकारी अजित भट, अनिल लाहुजा, विष्णू राठोड, दीपक अहिरे, मुकेश पाटील, लिपिक गोपाल पाली, सुनील पाटील व तौसिफ खान इत्यादींनी कारवाई केली.