भुसावळ – आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठी वृत्तपत्र प्रथम सुरु केले. त्यामुळे ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे नवरत्न सन्मान व पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. भुसावळ शहर पत्रकार संस्था स्थापनेला यंदा २५ वर्ष पूर्ण होत असून संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री,ना.संजय सावकारे,मुख्याधिकारी राजेंद्र फातले, प्रमुख वक्ते उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून
सरकारी वकिल, शहर पत्रकार संस्था संस्थापक अध्यक्ष अॅड. नितीन खरे,शहर पत्रकार संस्था माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी हे राहणार आहेत.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती, भुसावळ येथे आज ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन भुसावळ शहर पत्रकार संस्था, अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण, प्रोजेक्ट चेअरमन श्याम गोविंदा, पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.


