मुंबई – प्रवाश्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते रक्सौल दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी मध्य रेल्वे पुढीलप्रमाणे वाढवित आहे:

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते रक्सौल विशेष (२ फेऱ्या)
05558 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते रक्सौल साप्ताहिक विशेष गाडीची दिनांक २६.१२.२०२४ पर्यंत अधिसूचित असणारी फेरी आता दिनांक ०९.०१.२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे (२ फेऱ्या)
05557 रक्सौल ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडीची दिनांक २४.१२.२०२४ पर्यंत अधिसूचित असणारी फेरी आता दिनांक ०७.०१.२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे (२ फेऱ्या)
सदर विशेष गाडीच्या धावण्याचे दिवस, वेळ, रचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आरक्षण : विशेष भाड्यानुसार, विशेष ट्रेन क्रमांक 05557 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी आगाऊ आरक्षण दिनांक 01.01.2025 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.


