पोहण्यासाठी बंधार्‍यात गेलेल्या वकिलासह नेव्हीतील तरुण व आय.टी.अभियंत्याचा मृत्यू –

आजरा – पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. आजर्‍याजवळील परोली बंधार्‍यात रविवारी दुपारी चार वाजता हा प्रकार घडला. मयतांमध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, फिलीप अंतोन कुतिन्हो हे आयटी इंजिनीयर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस होते. नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमल्यानंतर हा प्रकार घडला.

बंधार्‍यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोझारीओ व फिलीप पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लॉईड गेला असताना तोही बुडाला. बंधार्‍याच्या काठावर असलेल्या मुलांनी आरडाओरड करताच नागरिकांनी बंधार्‍याकडे धाव घेतली.

दरम्यान बंधार्‍याच्या काठावर थांबलेल्या मुलांनी घरामध्ये फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यामुळे परोली बंधार्‍यावर एकच गर्दी जमली होती.