भुसावळ –
भाजपा नेते गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमान जनक उल्लेख संसदेत केला. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे मराठी पुत्र आहेत. भाजपा ने महाराष्ट्र व येथील महापुरुषांचा अपमान नेहमीच केला आहे. या अपमानाच्या घटना वाढतच आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आम्ही शहा यांचा जाहीर निषेध करतो.
या निषेधार्थ दि. २२ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर, स्टेशन रोड, भुसावळ येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे .दिलीप सुरवाडे ,उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख शिवसेना ( ठाकरे पक्ष) मा नगरसेवक शिवसेना, भुसावळ. यांनी कळविले आहे



