भुसावळ : येथील रेल्वेस्थानकावर दक्षिणेकडील मुख्य
प्रवेशद्वार जिन्याला लागून असलेला स्वयंचलित जिना बंद पडल्यामुळे वयोवृद्ध आणि महिलांचे हाल होत आहेत.
भुसावळ रेल्वे स्थानकावर दररोज शेकडो प्रवासी गाड्या ये-जा करतात. यातील लाखो प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत यावे व जावे लागते. स्वयंचलित जिना बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
येत्या काही दिवसांत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांचा भुसावळ स्थानकाचा दौरा असून यानिमित्त मेंटेनन्सचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. स्थानकावर स्वच्छतेसह इतर कामदेखील करण्यात येत आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी विशेषतः वयोवृद्ध महिलांची गैरसोय टाळावी यासाठी स्वयंचलित जिने सुरु केले भुसावळ रेल्वेस्थानकावर बंद असलेले स्वयंचलित जिने. आहेत. तांत्रिक अडचणीमुळे जिना बंद
पडला आहे. रेल्वे प्रशासनाने यासाठी
लाखो रुपये खर्च केले आहेत. जिने बंद पडल्यामुळे प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे
भुसावळ रेल्वेस्थानक मोठे आहे. या ठिकाणी बहुतांश रेल्वे गाड्या थांबतात. अनेक प्रवासी या ठिकाणाहून रेल्वे गाड्या बदलतात. या ठिकाणी प्रवासी संख्या अधिक असते. रेल्वे स्थानकाच्या बाहेर येताना व रेल्वेस्थानकावर जाताना प्रवाशांचे मोठे हाल हात आहेत. यात वृद्ध मंडळींचे अधिक हाल होताना दिसतात. प्रवाशांकडे बॅगा तसेच अवजड वस्तू असतात. यामुळे जिने चढताना दमछाक होते. तातडीने स्वयंचलित जिना सुरू करण्यात यावा अशी मागणी होत आहे.


