भुसावळ रेल्वे विभागात पेन्शन अदालत यशस्वीरित्या संपन्न ;

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी 16 डिसेंबर 2024 सोमवार रोजी भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहात डिसेंबर 2024 च्या पेन्शन अदालत घेण्यात आली अदालतीच्या माध्यमातून रु. 92,675/- ची पेमेंट संबंधित रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासन वर्षातून दोन वेळा पेन्शन अदालतींचे आयोजन करते. यासाठी तीन महिन्यांपूर्वी सूचना दिल्या जातात व तक्रारींकरिता अर्ज मागवले जातात.

या पेन्शन अदालतीत एकूण 79 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्यापैकी 3 तक्रारी पेमेंट संबंधित होत्या तर 76 तक्रारी इतर विषयांशी संबंधित होत्या. अदालतीच्या माध्यमातून रु. 92,675/- ची पेमेंट संबंधित रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. तसेच, पी.पी.ओ. (पेंशन पेमेंट ऑर्डर) व परिवार पेन्शनचे पुनरावलोकन करण्यात आले. सर्व तक्रारींचे पूर्णपणे निराकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर मंडल रेल्वे प्रबंधक सुनील कुमार सुमन होते. या वेळी लेखा व कार्मिक विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.एस. काझी यांनी केले, तर सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी . व्ही.एस. वडनेरे यांनी केले.

या अदालतीत भुसावळ, खंडवा, जळगाव आणि अकोला पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपर मंडल रेल्वे प्रबंधकांनी पेन्शनर्सना भविष्यातील त्रास टाळण्यासाठी त्यांच्या तक्रारी वेळेवर सोडविण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेटलमेंट विभाग, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षकांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस. वडनेरे यांनी मानले.