जळगाव जा.संग्रामपूर – रोजी दुपारी आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम चे जळगाव जा,संग्रामपूर तालुका संघटनेचे वतीने जळगाव जा तहसीलदार यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले

निवेदनात दिनाक 10/12/2024 रोजी संध्याकाळी अमानिय व्यक्तीने परभणी येथील जिल्हा अधिकारी कार्यालय समोर संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली असून सदर गुहेगारावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा,पोलिसांकडून निरपराध लोकांना जनवरा प्रमाणे अमानुष मारहाण केली वस्त्या मद्ये घुसून घरा,घरातून कोंबिंग ऑपरेशन चालविले तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण केली पोलिसांनी आंबेडकरी समाजावर नुकसानीचा ठपका ठेण्यासाठी वाहनांची तोडफोड केली या प्रकरणी जातीने लक्ष देऊन विटंबना करणाऱ्या सह पोलीस व पोलिसांसह सामील असणाऱ्या व त्यांना आदेशित करणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करा,व निरपराध तरुणावरील गुन्हे मागे घेण्यात यावे,अन्यथा आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम संघटना चे वतीने शासकीय प्रशासकीय स्तरा वर संविधनिक आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला , निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे,अनिल भगत तालुका अध्यक्ष जळगाव जा सुमेध दामधर संग्रामपूर तालुका अध्यक्ष, उदेभान दांडगे, निलेश लहसे श्रीराम भिडे,विजय वानखेडे,अमर तायडे सुनील बोदडे सह राजेंद्र ससाणे,सौ सरला राजेन्द् ससाणे, यांचेसह बऱ्याच सह्या आहेत,


