सहविचार सभा, याेगाभ्यास, आराेग्य तपासणीही हाेणार

भुसावळ : काेटेचा महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा याेजना विभाग प्लस २चे विशेष निवासी हिवाळी शबिर किन्ही येथे आयाेजित करण्यात आले आहे. गावातील सर्वाेदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत ते हाेईल.
शिबिरात सहविचार सभा, याेगाभ्यास, आराेग्य तपासणीही विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. उद्घाटन ११ डिसेंबर राेजी दुपारी ४.३० वाजता भावना चाेरडीया यांच्या हस्ते हाेईल.

अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डाॅ. जान्हवी तळेगावकर असतील. स्थानिक एज्युकेशन साेसायटी किन्ही या संस्थेचे चेअरमन डाॅ. मधूकर चाैधरी, अध्यक्ष नरेंद्र भिरूड, सचिव संजय चाैधरी, सरपंच नीलम साेनवणे, सर्वाेदय हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एम. चाैधरी, ग्रामसेवक आर. एस. बाेदडे हे उदघाटन सत्राला प्रमुख पाहुणे असतील. शिबिराचा समाराेप १७ डिसेंबर राेजी सकाळी १० वाजता हाेईल. उपसरपंच जयंत पाटील, उपप्राचार्य डाॅ. शरद अग्रवाल, पर्यवेक्षिका अर्चना झिंगरन यांची प्रमुख उपस्थिती राहिल. संस्कारमाला अंतर्गत १२ डिसेंबर राेजी ‘हसत खेळत पाणलाेट शिकूया’ या विषयावर दुपारी ४ वाजता पाडळसाचे पर्यावरणतज्ज्ञ विजय काेळी संवाद साधतील. १३ राेजी अॅनेमिनिया आराेग्य तपासणी शिबिर दुपारी ४ वाजता हाेईल. वैद्यकीय अधिकारी डाॅ. किर्ती फलटणकर या मार्गदर्शन करतील. १४ राेजी दुपारी ४ वाजता पालक सहविचार सभा हाेईल. १५ राेजी ‘याेगाभ्यास आराेग्याची किल्ली’ या विषयावर याेगप्रशिक्षिका ज्याेत्स्ना पाटील संवाद साधतील. १६ राेजी ग्राम प्रदक्षिणा निघेल. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता शेकाेटी व सांस्कृतिक कार्यक्रम हाेतील. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे संगीत शिक्षक व नाट्यकर्मी कुंदन तावडे हे स्वयंसेवकांशी हितगूज करतील, अशी माहिती राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एच. पाटील, सहाय्यक प्रा. श्वेता नागला यांनी दिली.


