भुसावळ – छतावर डाळ वाळविण्यासाठी गेलेल्या 29 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील केर्हाळे बु.॥ गावात 26 मार्च 2021 रोजी घडली होती. याप्रकरणातील संशयीताची पुराव्याअभावी भुसावळ सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

29 वर्षीय पीडीतेने रावेर पोलिसात संशयीत अरुण सुभाष प्रजापती (43, केर्हाळा) विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर भुसावळ सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या गुन्ह्यात फिर्यादी, मेडिकल ऑफिसर, तपास अधिकारी यांच्यासह सहा साक्षीदारांची सरकार पक्षाने तपासणी केली. संशयीतातर्फे एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने 30 नोव्हेंबर रोजी संशयीताची निर्दोष मुक्तता केली. संशयीतातर्फे अॅड.प्रफुल्ल आर.पाटील यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.जया झोरे पाटणकर व अॅड.संजय वानखडे यांनी सहकार्य केले.


