रावेर व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल अग्रवाल यांची आत्महत्या –

रावेर – रावेर व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल अग्रवाल यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
रावेर व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल पुनमचंद अग्रवाल (70) यांनी रविवारी रात्री काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारारार्थ जळगाव हलवले जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत आयुष अग्रवाल यांनी रावेर पोलीस ठण्यात दिलेल्या खबरीरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विष्णू भील करीत आहेत.