नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात प्रकल्प अहवाल या विषयावर एक दिवशीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

भुसावळ – नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात प्रकल्प अहवाल या विषयावर एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली . वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्र व वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय प्रोजेक्ट रिपोर्ट या विषयावर पदवी व पद्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. पवित्रा पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. ममताबेन पाटील , वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्र समन्वयक व कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. रश्मी शर्मा उपस्थित होते.
प्रमुख अथितींच्या हस्थे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना संशोधन अहवालाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असलेले महत्व, संशोधनातील आवश्यक कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रमुख वक्त्या प्रा.डॉ.पवित्रा पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रकल्प अहवाल कसा तयार करावा या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनि आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना प्रकल्प अहवालातील आवश्यक बाबी, प्रकरणे, उद्दिष्ट्ये, माहिती संकलन व प्रकल्प अहवालाची मांडणी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रश्मी शर्मा यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे प्रकार व प्रकल्प विषय कसा निवडावा या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सभोवताली असलेल्या विविध सामजिक समस्या पैकी आपला विषयासंदर्भात विषय कसा निवडावा, विषय निवड करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यावे, त्याची उद्दिष्ट्ये, गृहीतके, संशोधन पद्धती, मांडणी या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांचे आठ संघ तयार करून प्रकल्प अहवाल कसा तयार करावा या विषयावर प्रात्यक्षिक करण्यात आले व संघाच्या सादरीकरणावरून सहभागी संघापैकी दोन विजेता संघ काढण्यात आले.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस.व्ही.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. रश्मी शर्मा, सूत्र संचालन प्रा. सोनिया टेकवाणी व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. एकता बजाज यांनी केला. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ममताबेन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्रा.डॉ. के.पी. पाटील, प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. खिलेश पाटील, प्रा. भुषण चौधरी, प्रा. डॉ. सपना जंगले, प्रा. आकाश तायडे, प्रा स्वाती शेळके, प्रा. एकता बजाज, प्रा. श्रुती नेवे, प्रा. प्रियांका खडसे, प्रा. नंदिनी दायमा, श्री त्रिविक्रम वारके यांचे सहकार्य लाभले