भुसावळ –केंद्र सरकारन नुकतच आयुषमान भारत योजनेअंतर्गत ७० वर्षावरील प्रत्येक वद्ध व्यक्तींना आयुषमान भारत (आरोग्य विमा) योजने अंतर्गत ५ लाखापयांतचे कव्हर मिळणार आहे. यात ५ लाखापर्यंत मोफत उपचार केले जाणार आहेत. त्याचा ६ कोटी ज्येष्ठ नागरिक व ४.५ कोटी कुटुंबीयांना सद्धा फायदा होणार आहे . तसेच गेल्या वर्षी महात्मा ज्योतीबा फुले जन-आरोग्य योजनेची मर्यादा वाढवून ती १.५ लाखावरून ५ लाख रुपये केलेली आहे . आता १ जुलै पासून सर्व नागरिकाना या योजने अंतर्गत मोफत उपचार मिळणार आहेत. सदर योजनेचा लाभ केशरी, पिवळे तसच पांढरे रेशनकार्डधारकाना सद्धा मिळणार आहे.. या योजनचा लाभ मिळण्यासाठी या संबंधित नागरिकांना त्यांचे रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करून त्यावर १२ अंकी क्रमांक असलेले डिजिटल रेशनकार्ड असण आवश्यक आहे. रेशन कार्डच्या आधारावर तहसील कार्याकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांना रुग्णालयात भरती होण्यासाठी दाखला दिला जातो. त्याकरिता भुसावळ शहर आणि तालुका परिसरातील नागरिकाना या योजनचा लाभ मीळण्यासाठी भसावळ तहसील कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. विशिष्ट नागरिकांना मात्र वशिल्याने त्वरित रेशनकार्ड ऑनलाईन करून मिळत आहेत.मात्र नागरीकाना तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग , भसावळ याच्याकडून कुठलही मार्गदर्शन व सहकार्य मिळतं नसल्यान नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. अजूनही भसावळ शहर आणि तालुक्यातील बहुसंख्य रेशनकार्डधारकांचे रेशन कार्ड ऑनलाईन नसल्यामळ त्यावर बारा अंकी नंबर नसल्यामुळे ते या आरोग्य योजनेच्या लाभांपासून वंचित राहत आहे . त्याकरीता भुसावळ तहसील कार्यालयाकडून भसावळ शहर आणि तालक्यातील सर्वच रेशनकार्ड ऑनलाईन करून त्याना १२ अंकी नंबर मिळावा याकरीता आपण याबाबत तातडीन यद्धपातळीवर भुसावळ शहर आणि ग्रामीण परिसरात रेशन कार्ड ऑनलाइन शिबिरांचं जास्तीत जास्त ठिकाणी आयोजन कराव.तसेच भुसावळ जिल्हा जळगाव तहसील कार्यालय येथे नागरिकांनी आजपावेतो रेशनकार्ड वर 12अंकी क्रमांक मिळण्यासाठी जे जे अर्ज प्रस्तावित असतील त्यांचे अर्ज त्वरित निकाली काढावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली पत्रकांद्वारे कळविलेले आहे.




