ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्या वेळी वृक्षारोपण करून ते संवर्धन कराल तरच …….ब्रँड अँबेसिडर भुसावळ नगरपरिषद नाना पाटील


भुसावळ – भुसावळ नगरपरिषद भुसावळ हरित शहरात स्वच्छ शहर भुसावळ शहर व पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रमाणे जामनेर रोड साईबाबा मंदिराच्या मागे पत्रकार कॉलनीमध्ये भुसावळ नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ . वसंत राठोड भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील सर नगरपालिकेच्या समन्वयक प्रिया तायडे पत्रकार कॉलनीतील ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ गवळी , डॉ राहुल गवळी , तसेच परिसरातील नागरिक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सहभागी झाले होते

वृक्षारोपण झाल्यानंतर परिसरातील काही नागरिकांना आरोग्य अधिकारी वसंत राठोड समन्वयक प्रिया तायडे ब्रँड अँबेसेडर नाना पाटील यांच्या हस्ते वृक्षांचे वाटपही करण्यात आले .
यावेळी नागरिकांना वृक्ष लावण्याचा संदर्भात आवाहन करताना नाना पाटील यांनी सांगितले आज कोणत्याही प्रसंगी ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्या वेळी वृक्ष लावून त्याचे संगोपन करा त्याचे संवर्धन करावी तरच वृक्ष संवर्धनाचे परिणाम आपल्याला भविष्यात नक्कीच जाणवेल म्हणून आपण वृक्ष लावून त्याचे संवर्धन करा असे यावेळी त्यांनी सांगितले .
आरोग्य अधिकारी डॉ वसंत राठोड यांनीही लोकांना वृक्ष लावून त्याचे संवर्धन करा असे सांगितले .
यावेळी परिसरातील पत्रकार पंढरीनाथ गवळी फौज्या चितोडिया उमेश पाटील गणेश कोळी भुमिया चितोडीया कुमार पाचपांडे डॉक्टर राहुल गवळीतसेच नगरपालिकेचे आरोग्य खात्याचे कर्मचारी उपस्थित होते .

चौकट ———-/
भुसावळ शहराचे वाढते तापमान त्यामुळे इतर होणारा खर्च व निरोगी आरोग्य पाहता प्रत्येक नागरिकांनी किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन केले पाहिजे त्याचे परिणाम आपल्याला नक्कीच पाच वर्षात पाहायला मिळेल व त्यामुळे भविष्यात आर्थिक बचत होऊ शकेल . नागरिकांनी वृक्षरोपण संदर्भात भुसावळ नगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील सर 8087577520 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे