महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यातील सुमारे एक लाख सरकारी, निमशासकीय व खाजगी शाळांमधील जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांसाठी भगवान महावीर स्वामीजींच्या जीवनावर आधारित निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन, भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक महोत्सव समिती महाराष्ट्र शासन, तर्फे करण्यात आले असून, इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दोन गट करून विद्याथ्यर्थ्यांना इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा गुजराती भाषेत दोन पानांमध्ये अंदाजे 500 शब्दांत, चांगल्या हस्ताक्षरात निबंध लिहीण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
राज्यातील सर्व शाळांना हे निबंध स्पर्धा आयोजित करणे असल्याचे पत्र मंत्रालय व जिल्हाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले आहे.
निबंधाच्या शेवटी संपूर्ण पत्त्यासह विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, वय, मुख्याध्यापकांचे नाव, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, शाळेचे नाव, शाळेचा ईमेल आयडी, शहर, गाव, तालुका, जिल्हा अशी स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे.

20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सदरील निबंध स्पर्धेची मुदत असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा अशी विनंती जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महोत्सव समितीचे अजय ललवाणी, चेतन जैन हेमावत, संजय जैन, महेंद्र जैन, विकि पिपरिया,आनंद जैन,प्रकाश छाजेड व सकल जैन समाज तर्फे करण्यात येत आहे.
राज्य स्तरावर दोन्ही गटांमधून एक -एक ,
तर एकूण 36 जिल्ह्यामधून दोन्ही गट मधून प्रथम पाच-पाच विद्यार्थिनींना बक्षीसे तसेच, त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा समिती, पालक,यांचा सन्मान मुंबई येथील कार्यक्रमात “ग्लोबल एक्झिम ग्रुप ऑफ कंपनीज मुंबई” यांच्या सौजन्याने होणार असल्याची माहिती, मा.ना. मंत्री मंगल प्रभात लोढा, ललित गांधी, संदीप भंडारी, हितेश मोता, पवनराज संघवी,विभीषण चवरे,भक्ती गोरे यांनी दिली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा करीता पुढील मो क्रमांक 9673355572, 9822111201, 9423187097 ,9423187097, 9975350714, 9420652846, 94222 77044, यावर संपर्क साधावा .



