भुसावळ – भारत विकास परिषद भुसावळ शाखेच्या वतीने राष्ट्रीय समुहगान आणि भारत को जानो या प्रश्नमंजुषा अशा दोन स्पर्धा २४ रोजी प्रभाकर हॉल येथे संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन राधेश्याम लाहोटी, गिरीश हीरोडकर योगेश मांडे, सतीश खडायते डॉ.छाया चौधरी, कपिल मेहता, श्याम दरगड,चेतन पाटील रमाकांत भालेराव यांचे हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाले. दीपिका हींगवे यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले या वेळी लाहोटी यांनी आयोजकांचे उपक्रमातील सातत्याबद्दल कौतुक केले. उज्वल सराफ यांनी प्रास्ताविक करतांना भारत विकास परिषदेच्या कार्याचा आढावा मांडला. या नंतर दोन्ही स्पर्धांना सुरुवात झाली. समुहगान स्पर्धेत एकूण पंधरा शाळांनी तर भारत को जानों स्पर्धेत एकूण १५ शाळांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धा संपन्न झाल्यावर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी शाखा पालक नीलिमा नेहेते गिरीश हीरोडकर, छाया चौधरी, योगेश मांडे,तहसीलदार निता लबडे होते.

या वेळी आपल्या संबोधनात निता लबडे यांनी पालक व पाल्य यातील संभाषण कसे असावे यावर प्रकाश टाकला. त्यांनी काही उदाहरण देऊन हे समजाऊन सांगितले व आणि उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत उत्तम आयोजन करिता भारत विकास परिषद चे कौतुक केले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक वितरित करण्यात आले. समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक के. नारखेडे विद्यालय ( सरदार वल्लभभाई पटेल संघ )यांना तर द्वितीय क्रमांक तापी पब्लिक स्कूल ( वीर सावरकर संघ )यांना आणि तृतीय क्रमांक विवेकानंद विद्या मंदिर ( स्वामी विवेकानंद संघ ) यांना प्राप्त झाला.

स्पर्धेसाठी शाळांच्या संघांना महान व्यक्तींची नावे देण्यात आली होती. भारत को जानॉ या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक कोटेचा हायस्कूल ( हरगोविंद खुराणा संघ )द्वितीय क्रमांक ताप्ती पब्लिक स्कूल ( आर्यभट्ट संघ )तृतीय क्रमांक आदर्श हायस्कूल ( जगदीशचंद्र बोस संघ )तर लहान गटात प्रथम क्रमांक आदर्श हायस्कूल ( अमर्त्य सेन संघ ) द्वितीय वर्ल्ड स्कूल ( श्रीनिवास रामानुजन संघ ) तृतीय क्रमांक डॉ. उल्हास पाटील स्कूल ( जयंत नारळीकर संघ ) यांना प्राप्त झाला. यांना स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक वितरित करण्यात आले. या दोन्ही स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे संघ दि. 29 रोजी धुळे येथे होणाऱ्या प्रांत स्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेचे सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले.तर आभार सतीश खडायते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी , डॉ. नीलिमा नेहेते,सतीश खडायते, हरीश कोल्हे, विलास फालक, कपिल मेहता, श्याम दरगड, डॉ छाया चौधरी, राधा चव्हाण,विशाल अग्रवाल,सुनील इंगळे, हरीश कोल्हे, अर्चना खानापूरकर, भूषण वैद्य, गौरव हिंगाव, कुणाल महाजन, श्रीकांत जोशी,आनंद फडके, राजेश लढ्ढा, संजय लाहोटी,प्रदीप फिरके, विधी मेहता, दीपक इंगळे, वंदना खडायते, दीपिका हिंगवे, पल्लवी इंगळे, नेहा दरगड , वंदना खडायते, यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद लाभला.


