भुसावळात ‘महेश नवमी’ मोठ्या उत्साहात साजरी ; राधाकृष्ण प्रभात फेरीचा भक्तीमय समारोप :

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे महेश नवमीचा सण मोठ्याडी महेश स्तंभाजवळ मंगळवारी सकाळी प्रभात फेरीचा भक्तीमय वातावरणात समारोप झाला.याप्रसंगी प्रभात फेरीतील सर्व बंधू-भगिनींच्या उपस्थितीत भगवान श्री महेश (महादेव) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभात फेरीचे प्रमुख संघटक राधेश्याम लाहोटी यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर अत्यंत उत्साहात महाआरती संपन्न झाली.  

शिवरायाच्या रूपातील नृत्याने वेधले लक्ष.
महाआरतीनंतर सुभाष शिरसाळे यांनी भगवान शिवशंकराचा हुबेहूब पेहराव करून अप्रतिम नृत्य सादर केले. त्यांचा हा अवतार पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. संगीताच्या तालावर प्रभात फेरीतील सर्व भाविकांनीही ठेका धरत भक्तीनृत्य सादर केले. यासोबतच सादर झालेल्या भावगीतांमुळे संपूर्ण महेश स्तंभ परिसर शिवमय आणि धार्मिक वातावरणाने न्हाऊन निघाला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक पादचाऱ्यांनी व नागरिकांनी थांबून या सोहळ्याचा आनंद घेतला आणि कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रभात फेरीतील सदस्यांचा सत्कारयाप्रसंगी माहेश्वरी समाजातर्फे प्रभात फेरीतील सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. संघटक राधेश्याम लाहोटी यांनी उपस्थितांना संबोधित करताना महेश नवमीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.आर. ठाकूर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संजय अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिक आणि भाविकांना महाप्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली.

फोटो कॅप्शन - भुसावळ येथे महेश नवमी निमित्त महेश स्तंभा समोर भक्तिमय वातावरणात जल्लोष करताना राधेश्याम लाहोटी,जी आर ठाकूर,प्रा दिनेश राठी, संजय चांडक व राधाकृष्ण प्रभात फेरीतील सदस्य.