नाशिक रेल्वे स्टेशन येथे “एक स्टेशन एक उत्पाद” उपक्रमांतर्गत विशेष प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन

भुसावळ – भुसावळ मंडळाने आज दिनांक २५.०९.२०२४ रोजी नाशिक रेल्वे स्टेशन परिसरात “एक स्टेशन एक उत्पाद” या उपक्रमांतर्गत एक विशेष प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीचे उदघाटन मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते झाले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, स्टेशन प्रबंधक, मुख्य वाणिज्य निरीक्षक व स्टेशन कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक हस्तकला, विशेष उत्पादने व ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे आहे. यामुळे स्थानिक उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला आहे.

या प्रदर्शनीत नाशिक आणि पुणे , इगतपुरी , येवला त्याच्या आसपासच्या परिसरातील स्थानिक उत्पादकांचे विविध पारंपारिक व विशेष उत्पादने प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये प्रमुखता असलेल्या वस्तूंमध्ये पैठणी साडी, घरगुती ग्रामीण खाद्य उत्पादने, खादी कापड आणि उत्पादने, मातीची उत्पादने, बांबू उत्पादने, आदिवासी उत्पादने, चामड्याची उत्पादने, अनुकरण दागिने, कापड व हर्बल उत्पादने समाविष्ट होते. या प्रदर्शनाद्वारे ग्राहकांना स्थानिक संस्कृती व उत्पादनांची ओळख झाली. यामध्ये स्वतः मंडळ रेल प्रबंधक यांनी मातीचा पॉट बनवून सहभाग नोंदविला.

रेल्वे मंत्रालयाच्या ‘एक स्टेशन, एक उत्पाद’ या योजनेच्या अंतर्गत, स्थानिक उत्पादक व हस्तकलाकारांना त्यांच्या उत्पादनांना व्यापक ग्राहकवर्गासमोर मांडण्याची संधी मिळते.