शेगाव – देशातील आंबेडकरवादी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी “आंबेडकरराईट व्हॉइस मिडिया फोरम “या संघटनेची स्थापनाकरण्यात आली.
तसेच आंबेडकरवादी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभी राहणारी आंबेडकर राईट व्हॉइस मिडिया या पत्रकार च्या संघटनेची स्थापना आज दिनांक 24/ 9/ 2024 रोजी संत नगरी शेगाव मधील शासकीय विश्राम भवन येथील बैठकीत मध्ये करण्यात आली .
सदर या पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष Ib7न्यूज चैनल चे संपादक उत्तंमजी वानखडे हे असून यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न झाली यावेळी संस्थापक अध्यक्षांनी संघटनेच्या कामकाजाचा अजेंडा वाचून दाखवला आणि ही संघटना तळागाळातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तन-मन-धनाने काम करेल अशी ग्वाही दिली तसेच शासन दरबारी आंबेडकरवादी पत्रकारांच्या मागण्या व त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करेल तसेच देशाचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकार सक्षम व निर्भीड बनवण्याचा प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले
तसेच यावेळी संघटनेच्या केंद्रीय व राज्य कार्यकारणीच्या काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या यामध्ये केंद्रीय अध्यक्ष उत्तमजी वानखडे जळगाव जामोद, केंद्रीय महासचिव पदी प्रकाश सरदार भुसावळ (जळगाव खान्देश ),
संघटक पदी विजय खरात (मराठवाडा )
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी महेंद्र सावंग बुलढाणा ,
महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी देवचंद समदूर शेगाव ,
तर उपाध्यक्षपदी संतोष निर्भवणे (ठाणे )
सहसचिव पदी संघरत्न सपकाळे भुसावळ(जळगांव खान्देश)
राज्य संघटक पदी राहुल झोटे व राज्य सल्लागार म्हणून उमेश शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली


तसेच विदर्भ प्रमुख म्हणून किरण उपाध्याय पुलगाव तर
बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी उल्हास शेगोकार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित पत्रकार देवचंद्र हरिश्चंद्र मोरे मलकापूर, प्रशांत हेरोळे (कुरा मुक्ताईनगर) सुमित अरुण दामधर संग्रामपूर , दिगंबर शालिग्राम कंकाळ बुलढाणा , राजेश मनोहर राऊत ,देवडी मुकेश जनार्दन हेरोडे खामगाव ,उदयभान नारायण दांडगे संग्रामपूर , सतोष लक्ष्मण धुरंधर खामगाव ,सागर शिरसाट शेगाव, रवी शेगोकार शेगाव, सुभाष वाकोडे कनारखेड शेगाव, राजवर्धन शेगोकार शेगाव, श्याम पहूरकर भोनगाव शेगाव ,पंडित परघरमोर शेगाव ,नारायण दाभाडे शेगाव, प्रल्हाद खोडके डोनगाव , सतीश दांडगे मलकापूर ,अनिल खराटे मोताळा ,गोपाल इंगळे वरवट संग्रामपूर, कैलास खराटे मोताळा,
एन.के.हिवराळे मलकापूर ,उत्तमराव दानवे ,वर्धा राजवर्धन शेगावकर , महादेव धवसे,
आधी पत्रकारांची उपस्थिती होती पुढील केंद्र व राज्याच्या नियुक्त्या हे केंद्र व राज्याचे पदाधिकारी करतील त्यामुळे ज्या इच्छुक पत्रकारांना संघटनेत सामील व्हायचे आहे त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार यानी केले आहे


