महाराणा प्रताप विद्यालयाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि शिस्तीत संपन्न …
महाराष्ट्रातील लोककलेचा प्रत्यक्ष अनुभव भुसावळकरांना देण्याचा प्रयत्न ..
भुसावळ – श्री गणेश स्थापनेच्या व्या दिवशी महाराणा प्रताप विद्यालयाची गणपती विसर्जन मिरवणूक सकाळी 11वाजता पोलीस उप अधीक्षक क्रिश्नान्त पिंगळे यांच्या हस्ते आरतीने झाली .मिरवणुकीमध्ये लेझीम पथक ,झांजा पथक ,वारकरी दिंडी ,छत्र चामर ,शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप अश्वारूढ असे एकूण 650 विद्यार्थी सहभागी झाले होते .या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या लोककला बाल कलाकारांच्या सजीव देखावा हे होते .त्यांच्या सादरीकरणाला भुसावळ करांनी भरभरून प्रतिसाद दिला .मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांसोबत ,पालक आणि माजी विद्यार्थी यांनी बहुमोल मदत केली .




