भुसावळ भोरगाव लेवा समन्वय समितीच्या समुपदेशाने विस्कटलेल्या संसाराची घडी सुरळीत : समितीचे कौतुकास्पद कार्य :


भुसावळ – समाजातील घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण बघता,त्यासाठी जागरूकतेने कार्य करणाऱ्या भोरगाव लेवा समन्वय समितीने केलेल्या समुपदेशाने समाजातील एका विस्कटलेल्या संसाराची घडी सुरळीत होवून संसार सुरळीत झाल्याने समितीच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .
भुसावळ येथील राजेश पाटील व मीना चौधरी यांचे 3 वर्षांपुर्वी लग्न झाले. दोघांचा संसार सुरू झाला मात्र दोघांच्या आईवडीलांच्या अती हस्तक्षेपामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले त्याचे भांडणात रूपांतर होऊ लागले. या दरम्यान त्यांच्या संसार वेलीवर “राणी” नावाचे फुल उमलले होते. तरीही वाद मिटत नव्हते व मिटले नाही . वाद विकोपाला गेले
भांडणाचे प्रमाण वाढले शेवटी एके दिवशी रागात मीना आपल्या लहान मुलीला घेऊन माहेरी जळगावला निघून गेली. सासुच्या होणा-या त्रासातुन कसा मार्ग काढावा हे समजत नव्हते.

अशा परिस्थितीत ती भुसावळला आली व सासरी जायचे नाही व संसार मोडण्याची तयारी दर्शविली. यावेळी अध्यक्ष सुहास चौधरी शरद फेगडे व सामुपदेशिका आरती चौधरी यांनी तीचे व राजेशचे सामुपदेशन करण्याचा निर्णय घेतला. राजेश पाटीलला बोलावले. दोघांना एकत्र बसवून प्रभावी भाषेत, योग्य समज देऊन, थोडे रागावून प्रेमाने समुपदेशन केले.
दोघांच्या आईवडीलांशी बोलुन संसार सुरळीत होईल असे बघीतले. दोघासह त्यांचे आईवडिलांच्या होकारार्थी उत्तरा नंतर दोन दिवसांनी परत त्यांना भुसावळला बोलावून आनंदात तीची तिच्या नव-याबरोबर सासरी पाठवणी केली.
या प्रसंगी शाखा अध्यक्ष सुहास चौधरी, शरद फेगडे, सामुपदेशीका आरती चौधरी, सुभाष भंगाळे, मंगला पाटील, अरुण चौधरी, आर. जी. चौधरी, हरीष फालक, कीरण चौधरी, उपस्थित होते.
समाजातील वाढलेल्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर एक संसार मार्गावर आल्याने समाजातील सर्व थरातून आनंद झाला व्यक्त केला .