भुसावळ - "एक दुर्वा समर्पणाची" या उपक्रमाचे यंदा ८ वे वर्ष आहे. यंदाचाही गणेशाेत्सव दरवर्षी प्रमाणेच ‘अंतर्नाद_प्रतिष्ठान’ने दूरदृष्टिकाेनातून साजरा करण्याचा दृढ निर्धार केला आहे. केलेला निर्धार हा काही जगावेगळा आहे, असे अजिबात नाही. गणेशाेत्सवातील पाच दिवस समर्पणाची दुर्वा अर्पण करायची, असे या उपक्रमाचे सुस्पष्ट स्वरुप आहे. समाजातील जे उपेक्षित विद्यार्थी आहेत,त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. दरराेज एक गरजू शाळा निवडून त्या ठिकाणी अध्ययन करणारे गाेरगरीब विद्यार्थी हुंडकायचे. त्यांना पाटी, वह्या, दप्तरे, पेन, पेन्सील, कंपासपेटी, गणवेश अशा काेणत्या शैक्षणिक साहित्याची गरज आहे, त्याची नाेंद करायची अन् ते त्यांना दात्यांनी केलेल्या मदतीतून पुरवायचे, असा हा ‘समर्पण गणेशाेत्सव’ आहे.
याच उपक्रमाच्या माध्यमातून दर वर्षी साधारण 5 शाळांमध्ये गरीब आणि गरजू विदयार्थ्याना शालेय साहित्य आपण पुरवतो. यंदा या उपक्रमाचेआठवे वर्ष आहे. निर्व्याज भावनेतून ज्यांना या उपक्रमात सढळ हाताने मदत करायची असेल त्यांनी पुढे यावे.‘अंतर्नाद प्रतिष्ठान’आपला मदतीचा हात विश्वासाने हातात घेण्यासाठी तयार आहे. आम्ही कृतीशिल संकल्प केला आहे. आपणही त्यात हातभार लावाल,अशी अपेक्षा आहे, किंबहुना तसा विश्वासही आहे. आपण आपली मदत साहित्य किवा रोख रक्कम देउन करु शकता.अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख आणि प्रकल्प समन्वयक यांच्याशी संपर्क साधू शकता.
चला, तर मग यंदा पुन्हा विघ्नहर्त्याला समर्पणाची दुर्वा अर्पण करू या!

ज्यांना online रोख रक्कम मदत म्हणून द्यावयाची असल्यास त्यांनी संस्थेच्या या बँक अकाउंट वर
Antarnad Pratishthan
Bank Name : Bank of India
Acc No : 067310110009575
IFSC Code : BKID0000673
किंवा
7588009492: संदीप पाटील
9850355350: विक्रांत चौधरी
9421741824 : अमित चौधरी
7588815381: योगेश इंगळे
75888 15384 : जीवन महाजन
94205 57753 : ज्ञानेश्वर घुले
या Google Pay आणि Phone Pay अकाउंट वर टाकू शकता.
प्रकल्प प्रमुख
ज्ञानेश्वर घुले
94205 57753
प्रकल्प समन्वयक
अमितकुमार पाटील
80554 77097
प्रकल्प सह समन्वयक
चंद्रकांत सूर्यवंशी
91466 39220
तसेच उपक्रम समिती
योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, संजय भटकर, प्रसन्ना बोरोले, विक्रांत चौधरी, कुंदन वायकोळे, हितेंद्र नेमाडे, समाधान जाधव, अमित चौधरी, ललित महाजन, राजू वारके, भूषण झोपे, देव सरकटे, प्रा.शामकुमार दुसाने, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, तेजेंद्र महाजन, उमेश फिरके, विपीन वारके, हरीश भट, जीवन सपकाळे, सचिन पाटील, निवृत्ती पाटील, प्रमोद पाटील , राजेंद्र जावळे, मंगेश भावे आदी . सहकार्य करावे असे आवाहन संदीप वसंतराव पाटील 7588009492,9209248392 यांनी केले आहे .


