भुसावळात ऋषीपंचमी निमित्त हाेणार प्रसाद वाटप :

भुसावळ : श्री गजानन महाराज संजिवन समाधी ग्रहण तिथी ऋषीपंचमीनिमित्त जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे दि.८ सप्टेंबर रोजी प्रसाद वाटप स.१० ते रा.९:३० पर्यंत होणार आहे.
८ रोजी स. ६ वाजेपासून विजयग्रंथ पारायण वाचनास प्रारंभ हाेईल. तरी ज्या भाविकांना पारायणास बसायचे असेल त्यांनी ग्रंथ व दिवा सोबत आणावा. दरम्यान श्रीं ची पूजा स.८:३०. ते १०:३० हाेईल. तरी या सोहळ्यास उपस्थिती द्यावी. दरम्यान ज्या भाविकांना प्रसादासाठी पाेळ्या, बुंदिचे लाडू, चनादाळ, गहू, तेल अथवा देणगी द्यावयाची असल्यास त्यांनी जामनेर राेडवरील गजानन महाराज देवस्थान पदाधिका-यांशी दि.८ रोजी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.