ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा ;

भुसावळ – ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतीमेस प्राचार्या नीना कटलर यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या प्रसंगी इयत्ता नर्सरी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य ,गायन, नकला तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत होते .त्यांनी वर्गात जाऊन अध्यापनाचे कामकाज पाहिले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपले विचार व्यक्त करून त्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्या मनप्रीत कौर,श्रद्धाली घुले समन्वयक सोनाली मुजुमदार,अंनेट मॅथ्यू,हर्षला चौधरी,स्मिता जाधव ,सविता सहजे उपस्थित होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये शिक्षक दिना निमीत्त द्वीप प्रज्वलन करतांना निना कटलर सोबत श्रद्धाली घुले,मनप्रित कौर,सोनाली मुजूमदार ,सविता सहजे ,स्मिता जाधव ,ऍनेट मॅथ्यू ,हर्षदा चौधरी ,वर्षा काळे ,प्रतिभा काकडे व इतर शिक्षक वर्ग.