भुसावळ – येथील रोटरी क्लब मध्ये नुकताच पाच सप्टेंबर चे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे अध्यक्ष अनंत पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ रश्मी पाटील उपस्थित होत्या.
या प्रसंगी डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज चे डीन डॉ नारायण आर्विकर, तसेच डॉ प्रा माया आर्विकर, दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन एस राणे, सौ राजश्री कात्यायनी, वा श्री मदन बोरकर यांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मान वस्त्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना डॉ नारायण आर्वीकर यांनी अध्यापन क्षेत्रात होऊ घातलेल्या अमुलाग्र बदल स्वीकारण्यासाठी आपण तयार असल पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असताना च त्यांना आपलेपणा वाटेल असे बदल शिक्षण प्रणाली मध्ये झाले पाहिजेत असे मत व्यक्त केले.
प्रा डॉ दयाघन राणे यांनी शिक्षण क्षेत्रातील भूतकाळातील परिस्थिती आणि वर्तमान या बद्दल तुलना करीत असताना विद्यार्थ्यांकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर माहिती उपलब्ध आहे म्हणून त्यांना वर्गात बसायची आवश्यकता नाही असे वाटते. म्हणून सध्या कॉलेज मधली उपस्थिती खूप कमी झालेली आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून टीचर रोबोट तयार करण्यात आलेले असून त्यामुळे नजीकच्या भविष्यात शिक्षण क्षेत्रात विशेषतः शिक्षकी पेशा वर अत्यंत नकारात्मक प्रभाव पडेल असे मत व्यक्त केले.
डॉ माया आर्वीकर यांनी मनोगत व्यक्त करीत असताना व्यावसायिक शिक्षण घेणारा विद्यार्थी आता फारसा गंभीर राहिलेला नाही म्हणून आता नव्याने काही पद्धती बदलाव्या लागतील. शिक्षण पद्धती जास्त आकर्षक आणि सखोल करणे आता गरजेचे आहे.
सौ. राजश्री कात्यायनी यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिकवत असताना मानवी समाधान वाटते आणि विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहतो हे ऐकून आपणं घेत असलेल्या परिश्रमाचा अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले. मदन बोरकर हे व्यावसायिक असून त्यांनी काही काळ शिक्षण क्षेत्रात करू केलेले होते. त्यांनी मनोगत व्यक्त करीत असताना शिक्षकाची विद्यार्थ्याच्या विकासातली भूमिका स्पष्ट करून विद्यार्थी शिकरर असतानाच शिक्षकाचाही व्यक्तिमत्त्व विकास होतो असे मत व्यक्त केले.
उपस्थित शिक्षकांचा सत्कार रोटरी क्लबचे अध्यक्ष मा श्री अनंत पाटील यांचे हस्ते तर प्रमुख पाहुण्या सौ रश्मी पाटील यांचा सत्कार रोटरी क्लबच्या सचिव सौ आरती चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत असताना सौ रश्मी पाटील म्हणाल्या की प्राथमिक शाळेत शिकवत असताना विद्यार्थ्यांमध्ये मन रमून जाते. चिमुकल्या मुलांसोबत वावरल्याने मन नेहेमी प्रसन्न राहते. आपल्या मनोगतमध्ये त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक स्तरावरून कसे बदल होत आहेत हे ही स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी आदर्श शिक्षक म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे उदाहरण देत बदलत्या वातावरणात आणि सामजिक परिस्थिती मध्ये वावरत असताना शिक्षकाने आपल्या आदर्शाची सुधा जपणूक केली पाहिजे तरच समाजाला योग्य दिशा मिळू शकेल. कारण शिक्षकांचे अनुकरण बऱ्याच व्यक्ती करत असतात. असे मत व्यक्त केले.
रोटरी क्लब च्या सचिव सौ आरती चौधरी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.



