भुसावळ – शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साईबाबा मार्बल, आदर्श नगराजवळ रस्त्यावरून दुचाकीवरून जाणार्या 35 वर्षीय युवकास ट्रकने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू ओढवला. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता घडला. या अपघातात अजय सुरेश आठवाणी (35, शिवशक्ती अपार्टमेंट, नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजय आठवाणी (टप्पी सेठ) हा दुचाकीवरून येत असताना भरधाव ट्रक (ए.पी.05 टी.एम.5129) ने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जमाव प्रचंड संतप्त झाला होता. या प्रकरणी प्रकाश रमेशलाल आठवाणी (भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक शेख सरदार मस्तान (54, मेन रोड, कांचीकचेरा क्रीडा, आंध्रप्रदेश) विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.



