मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बळ यांचे आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित :


भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातर्फे 01/08/2024 रोजी मध्य रेल्वे आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि मुंबई विभागातील एकूण 04 संघांनी सहभाग घेतला होता, त्यातील अंतिम सामना पावसामुळे पुढे ढकलण्यात आला होता 02 /08/2024 ला नागपूर आणि सोलापूर विभाग यांच्यात खेळला गेला ज्यामध्ये नागपूर विभाग विजेता तर सोलापूर विभाग उपविजेता ठरला.
नंतर, 02.8.24 रोजी *आंतरविभागीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये भुसावळ, नागपूर आणि मुंबई विभागातील एकूण 03 संघांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये मुंबई आणि भुसावळ विभाग यांच्यात अंतिम सामना झाला, ज्यामध्ये *मुंबई विभाग विजेता* तर भुसावळ विभाग उपविजेता ठरला.