भुसावळात इस्कॉन तर्फे उद्या ७ जुलै रोजी श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव २०२४ चे आयोजन :

भुसावळ – उद्या श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे रथ यात्रा महोत्सव साजरी होत आहे. भगवान श्री जगन्नाथ सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी मंदिराबाहेर येत आहेत व त्यांची रथातून मिरवणूक काढण्यात येते. जगन्नाथ पुरी येथे जाण्यास सर्वांना शक्य होत नाही म्हणून भुसावळच्या नागरिकांना रथयात्रेचा लाभ मिळावा म्हणून इस्कॉन भुसावळ तर्फे उद्या ७ जुलै रविवार रोजी श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन भुसावळचे अध्यक्ष श्रीमान रासयात्रा प्रभूची यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे; शुभारंभ – ७ जुलै रविवार संध्याकाळी ४ वाजता ज्ञानेश्वर गार्डन शांतीनगर, भुसावळ येथून यात्रेस प्रारंभ होणार आहे

रथयात्रेचा मार्ग – शांतीनगर (ज्ञानेश्वर गार्डन, डॉक्टर निर्मल जावळे यांचा दवाखाना) – गांधी पुतळा – जळगाव रोड – गणेश कॉलनी रिक्षा स्टॉप – गणेश कॉलनी – रामानंद हॉल येथे समारोप (संध्याकाळी ७ वाजता).

त्यानंतर संध्याकाळी ७ वाजेपासून रामानंद हॉलमध्ये कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, महाआरती होणार आहे. त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

रथयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी भुसावळचे आमदार संजय सावकारे व सौ रजनीताई सावकारे आवर्जून उपस्थित राहणार आहे. तरी सर्व भुसावळकरांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्री जगनाथ भगवंतांची कृपा पदरात पाडून घ्यावी. जो भक्त भगवंतांचा रथ बघतो त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो भगवत धामत जाण्यासाठी योग्य बनतो.