आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या धावणार ;

मध्य रेल्वे पंढरपूर/मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर व मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत

१. नागपूर – मिरज विशेष (२ सेवा)

गाडी क्रमांक 01205 विशेष दि. १४.०७.२०२४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01206 विशेष दि. १८.०७.२०२४ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे व अरग.

संरचना : १ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ९ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन.

२. नागपूर – मिरज विशेष (२ सेवा)

गाडी क्रमांक 01207 विशेष गाडी दि. १५.०७.२०२४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01208 विशेष गाडी दि. १९.०७.२०२४ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे व अरग.

संरचना : २ तृतीय वातानुकूलित, १४ शयनयान व २ सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन.

३. नवी अमरावती – पंढरपूर विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01119 विशेष नवी अमरावती येथून दि. १३.०७.२०२४ आणि दि. १६.०७.२०२४ (२ सेवा) रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01120 विशेष पंढरपूर येथून दि. १४.०७.२०२४ आणि दि. १७.०७.२०२४ (२ सेवा) रोजी १९.३० वाजता सुटेल आणि नवी अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल.

थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.

संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ९ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन.

४. खामगाव – पंढरपूर विशेष (४ सेवा)

गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव दि. १४.०७.२०२४ आणि १७.०७.२०२४ (२ सेवा) रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01122 विशेष पंढरपूर येथून दि. १५.७.२०२४ आणि १८.७.२०२४ (२ सेवा) रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल.

थांबे : जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.

संरचना: २ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान , ९ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन.

५. लातूर – पंढरपूर (१० सेवा)

गाडी क्रमांक 01101 स्पेशल लातूर येथून दि. १२.०७.२०२४, १५.०७.२०२४, १६.०७.२०२४, १७.०७.२०२४ आणि १९.०७.२०२४ (५ सेवा) ला ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01102 विशेष पंढरपूर येथून दि. १२.०७.२०२४, १५.०७.२०२४, १६.०७.२०२४, १७.०७.२०२४ आणि १९.०७.२०२४ (५ सेवा) रोजी १३.५० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल.

थांबे : हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.

संरचना: १ प्रथम तथा द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी २ सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅन.

६. भुसावळ – पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा)

गाडी क्रमांक 01159 अनारक्षित विशेष भुसावळ येथून दि. १६.०७.२०२४ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01160 अनारक्षित विशेष पंढरपूर येथून दि. १७.०७.२०२४ रोजी २२.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल.

थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी.

संरचना: ५ शयनयान आणि २ सामान तथा गार्ड ब्रेक व्हॅनसह १३ सामान्य द्वितीय श्रेणी.

७. मिरज – पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा)

गाडी क्रमांक 01107 मेमू विशेष मिरज येथून दि. १२.०७.२०२४ ते २१.०७.२०२४ (१० सेवा) ०५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01108 मेमू विशेष पंढरपूर येथून दि. १२.०७.२०२४ ते २१.०७.२०२४ (१० सेवा) दरम्यान ०९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १३.५० वाजता पोहोचेल.

थांबे : अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद आणि सांगोला.

संरचना : १२ सामान्य मेमू

८. मिरज – कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा)

गाडी क्रमांक 01209 मेमू विशेष मिरज येथून दि. १२.०७.२०२४ ते २१.०७.२०२४ (१० सेवा) पर्यंत १५.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01210 मेमू विशेष कुर्डुवाडी येथून दि. १२.०७.२०२४ ते २१.०७.२०२४ (१० सेवा) पर्यंत २१.२५ वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ०१.०० वाजता पोहोचेल.

थांबे : अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब.

संरचना: १२ सामान्य मेमू

आरक्षण: आषाढी विशेष गाडी क्रमांक 01205, 01206, 01207, 01208, 01119, 01120, 01121, 01122, 01101 आणि 01102 साठी आरक्षण ०७.०७.२०२४ पासून संगणकीकृत केंद्रावर उपलब्ध होईल.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.