भुसावळ पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सेवानिवृत्तांचा सत्कार ;


भुसावळ – भुसावळ पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सेवानिवृत्त होणाऱे म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे मुख्याध्यापक ललित फिरके, हे नारखेडे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रमण भोळे, महाराणा प्रताप हायस्कूलचे क्रीडा शिक्षक , तालुका क्रीडा समन्वयक राजेंद्र कुलकर्णी व सु.रा. आंबेडकर विद्यालयाचे लिपिक संजय सुरवाडे यांचा सत्कार पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.धाडी, तुषार प्रधान, शा. पो. आ.अधीक्षक अजित तडवी यांच्यासह इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर .आर‌ धनगर, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप साखरे, आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक कापडणे ,तालुका माजी क्रीडा समन्वयक व जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी संचालक बी एन पाटील, व सर्व विषय तज्ञ व बी आर सी चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी बी डी धाडी, तुषार प्रधान, अजित तडवी सर्वांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.सर्व निरुपार्थीनी सत्कारा निमित्त आभार व्यक्त केले.अध्यक्ष भाषणात किशोर वायकोळे यांनी सेवानिवृत्ती निमित्त गटसाधन केंद्रामध्ये आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणे म्हणजे आपल्या कामाची ही खरी पावती आहे असे मत व्यक्त करून भावी आयुष्य निरोगी व आनंददायी राहण्याच्या शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप साखरे यांनी केले.