भुसावळ – भगवंताच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची अनुभूती अनेक संतांच्या सोबत मिळते असा काहीसा अनुभव येथील दे ना भोळे महाविद्यालयाचे प्रा . डॉ दयाधन राणे यांना आल्याचे त्यांनी सांगितले . अतिशय वाईट असा प्रसंग सर्वांवर आलाय भक्तांवर जणू .दुःखाचा डोंगर कोसळला स्वामी भक्तीकिशोर दास शास्त्री यांनी अकाली आपल्यातून एक्झिट घेतली त्यांचे जाण्याने प्रचंड मोठी धार्मिक पोकळी निर्माण झाली .अन शास्त्रीजीचे सर्व कार्य डोळ्यासमोर तरळून आले .त्यांनी आपल्या सुमधुर व मृदू भाषेत समाज प्रबोधनाचं काम केलं, नवीन दिशा दाखवण्याचं कार्य पूर्णंकरून आपला प्रवास संपवत ते आपल्या धामात परत गेलेत. आज त्यांच्या काही आठवणी प्रा डॉ दयाधन राणे यांनी साश्रू नयनांनी कथन करून स्वामीभक्तीकिशोर दास यांना जय स्वामीनारायण (भावपुर्ण आदरांजली अर्पण केली आहे यानिमित्त हे प्रासंगिक …प्रा राणे यांचे शब्दात ….

शास्त्री स्वामी श्री भक्तिकिशोर दास जी यांच्याशी माझी खूप जवळची बांधिलकी होती. तसे शास्त्रीजी मनाने सर्वांच्याच खूप जवळ होते. पण मला त्यांचा थोडा विशेष अनुभव होता.
त्यांच्या बद्दलच्या अनेक आठवणी माझ्याजवळ आहेत. त्या पैकी काही आठवणी मला आपल्या सर्वांसोबत शेअर करायला आवडेल.
मी व्यक्तिशः शास्त्रीजीं चा पहिला सत्संग फैजपूर स्वामीनारायण मंदिर च्या पहिल्या अन्नकुट महोत्सवाच्या वेळी ऐकला. त्यांची प्रभावी मांडणी आणि बोलण्याची प्रभावी शैली या मुळे ते कायम लक्षात राहिले. त्या सत्संग मधल त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं. शास्त्रीजींनी म्हटलं होत, “तुम्ही एक दाणा पेरला तर भगवंत तुम्हाला हजार दाणे देतील. पण ते हजार दाणे मिळवण्यासाठी तुम्हाला आधी एक दाणा पेरावाच लागेल. तर च ते मिळतील” अत्यंत साधं व्यवहारा मधल हे वाक्य भगवंत भक्ती, भक्तांना दान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, आणि भगवद भक्तांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मांडणी मध्ये अत्यंत प्रभावीपणे वापरलेलं होत. त्या नंतर माझी बऱ्याच वेळा त्यांच्याशी भेट झाली. प्रत्येक भेटीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एखादा तरी नवीन पैलू कळायचा.
सावदा गुरुकुल मधल्या एका कार्यक्रमात नेहेमी प्रमाणे त्यांच्या भोवती खूप सत्संगी गोळा झालेले होते. सगळ्यांशी ते त्यांच्या प्रासादिक अमृतवाणी ने संवाद साधत होतें. एक जण म्हणाला स्वामीजी तुम्ही मधा सारखे गोड आहात. मी लगेच म्हटलं होतं, उपमा थोडी वेगळी द्यायला पाहिजे दादा. स्वामीजी मधा सारखे नाहीत. मधाच्या पोळ्या सारखे आहेत. ते उभे राहतात तेथे भक्त गोळा होतात. पोळ असेल तरच मधमाशा जमतात ना !
स्वामीनारायण सिरियल मध्ये शेवटच्या भागात सहजानंद स्वामी आपल्या धामात गेलेत त्या वेळच्या चित्रीकरणात एक संवाद आहे. भगवंत म्हणले होते, तुम्ही शोक करू नका. मी तुमच्यातच आहे. तुमच्या सोबतच आहे. चर्मचक्षूनी तुम्ही माझे स्वरूप पाहू शकत नसाल पण तरीही मी स्थापित केलेल्या मंदिरांच्या स्वरूपात, आचार्यांच्या स्वरूपात आणि भगवद स्वरूप संतांच्या स्वरूपात अहर्निश तुमच्या सोबत आहे. भगवंताच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची अनुभूती अनेक संतांच्या सोबत मिळते. तशी ती भक्तिकिशोरदास जी शास्त्रींच्या सोबत असणाऱ्यांना ही मिळत असे. मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे
माझ्या पी एच डी च काम अंतिम टप्प्यात होत. कधी कधी वाटायचं की त्या अभ्यासक्रमाचा कार्यकाळ संपून जाईल आणि पुन्हा नव्यानं प्रवेश घ्यावा लागेल. शेवटचे काही दिवस माझ्याजवळ होते. आणि रात्र न दिवस मी त्या अभ्यासक्रमाच्या पूर्तेते साठी काम करत होतो. त्याच काळात माझी एकदा शास्त्रीजींशी भेट झाली. मी चिंता करीत हा विषय त्यांच्याशी बोललो, अगदी सहजपणे शास्त्रीजी म्हणाले, सर, काम सुरू ठेवा,भगवंतावर ही विश्वास ठेवा, तो विश्वास तुम्हाला अडचणीं मधून बाहेर काढेल, मी ही तुमच्या साठी प्रार्थना करेल. मी अत्यंत सकारात्मक मनःस्थितीत शास्त्रीजीं समोरून उठलो. माझं काम पुढे सरकायला लागलं, अधून मधून शास्त्रीजी मला भेटत असतं किंवा आम्ही फोन वर बोलत असू, तेव्हा ते मला सांगायचे, सर तुमच्या साठी माझी प्रार्थना सुरू आहे. अनेक अडथळे पार करत शेवटी माझा प्रबंध सादर करण्याचा दिवस उजाडला. मी शास्त्रीजीना फोंनकरून सांगितलं, शास्त्री, तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलोय, आज प्रबंध सादर करायचा आहे. शास्त्रीजी नी प्रसन्न पणे सांगितलं, सर, प्रबंध सादर करण्यासाठी विद्यापीठाच्या आवारात प्रवेश कराल तेव्हा मला फोन कराल, मी इकडे प्रार्थना करायला बसेल. प्रबंध सादर झाला म्हणजे पुन्हा मला फोन कराल तेव्हा मी प्रार्थनेवरून उठेल. मीं विद्यापीठात प्रवेश केल्यावर स्वामीजींना फोन केला. आणि पुढे गेलो. अगदी माझ्या साठीच म्हणून सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत अश्या पद्धतीने प्रबंध सादर झाला. पुढच्या सोपस्कारांची ही व्यवस्था आधीच होऊन गेलेली होती. मी चकित झालो. स्वामीजींना फोंन केला. स्वामीजी म्हणाले, सर आता प्रश्न संपलेले आहेत. आणि खरोखर मला अशक्य वाटणारा तो प्रवास स्वामीजींच्या आशीर्वादाने संपला. मी स्वामीजींना म्हटलं, स्वामीजी आम्ही आतापर्यंत तुम्हाला माणूस समजत होतो, पण तुम्ही खरोखर प्रत्यक्ष प्रकट भगवद स्वरूप आहात. आणि ते सांगायचे सर, मी भगवंताचा एक खूप साधा भक्त आहे.
कुणाला काय वाटेल ते मला माहिती नाही, पण ज्या बऱ्याच संतां मध्ये मला देवत्व जाणवलं, त्या पैकी शास्त्री स्वामी भक्तीकिशोरदासजी यांचं नाव आहेच हे नक्की ! आपण सामान्य माणसे आहोत म्हणून आपल्याला आनंद, दुख्ख, विरह या संवेदना आहेत. म्हणूनच आपण आनंद झाला म्हणजे उल्हसित होतो, दुखः झालं म्हणजे वेदनेने तळमळत रडतो ही, निराश ही होतो, पण शास्त्री स्वामी भक्तीकिशोरदासजी यांच्या बद्दल मी म्हणेल की ते अलौकिक शक्ती शक्ती असणारे ईश्वरीय व्यक्तिमत्त्व होते, जे जन्मले नाही, निवर्तले ही नाही त्यांनी आपल्या ग्रहावरचा त्याचा प्रवास आपल्या सोबत केला, कथा रुपात समाजाच्या प्रबोधनाचं काम केलं, नवीन दिशा दाखवण्याचं कार्य पूर्णंकरून आपला प्रवास संपवत ते आपल्या धामात परत गेलेत.
जय स्वामीनारायण
प्रासंगिक – प्रा डॉ दयाघन एस राणे
भुसावळ


