प्रा डॉ दयाघन राणे यांची नशाबंदी मंडळावर जळगाव जिल्हा संघटक पदी नियुक्ती :

 भुसावळ -  सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र  शासन अनुदानित नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटक पदी दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे भौतिक शास्त्र विभाग प्रमुख आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक तसेच विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य प्रा डॉ दयाघन एस राणे  यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. 
 कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या संघटकांच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात मंडळाच्या सरचिटणीस श्रीमती वर्षा विद्या विलास आणि मुख्य संघटक अमोल मडामे यांनी प्रा डॉ दयाघन राणे यांना नियुक्ती पत्र दिले. 
 आपल्याला जळगाव जिल्हा संघटक पदी नियुक्ती मिळाल्यामुळे व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्यांना समुपदेशन आणि उपचार या माध्यमातून व्यसनापासून परावृत्त  करण्यासाठी प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करण्यासाठी शाळा कॉलेजेस आणि सामाजिक संस्थांमध्ये प्रचार कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करून निर्व्यसनी तरुण पिढी निर्माण करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रा डॉ दयाघन राणे यांनी सांगितले .
  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून प्रा डॉ दयाघन राणे यांचे गेल्या पंचवीस वर्षांपासून व्यसनमुक्ती या विषयांसह विविध सामाजिक प्रश्नासाठी जनजागृती तसेच विद्यार्थी विकासाचे कार्य सुरू आहेच. पण नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासना साठी कार्य करण्याची संधी मिळालेली असून आता हे कार्य मोठ्या प्रमाणात करता येईल असे मतही प्रा डॉ दयाघन राणे यांनी व्यक्त केले.