भुसावळातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर यांचे इंग्लडची एमआरसिओजी परीक्षेत घवघवीत यश ; 

भुसावळ – येथीळ अर्पण हॉस्पिटलच्या  प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर यांनी  इंग्लड येथील  एमआरसिओजी ही अतिशय कठिण समजली जाणारी परीक्षा देवून या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे . या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे .

      एमआरसिओजी म्हणजे  ( member of royal college of obstetrics and gynaecology )  ही परीक्षा  इंग्लैंड मध्ये स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी द्यावी लागते. संपुर्ण जगात ही एक अतिशय प्रतिष्ठित  आणि कठिन परीक्षा समजली जाते. ही  परीक्षा तीन पार्ट्स मध्ये असते. तीनही भाग उत्तीर्ण झाल्यावर रॉयल कॉलेजचे सदस्यत्व ( royal college ची membership ) मिळते. त्यानंतर तुम्ही स्त्रीरोग व प्रसूति तज्ञ म्हणून इंग्लंड येथे काम करू शकतात. या परीक्षेचे महत्वपूर्ण वैशिष्ठ आडे की  ही परीक्षा इतर १३ देशांमध्येही ग्राह्य धरली जाते. 

       अद्यावत ज्ञान मिळावे या उद्देशाने ही परीक्षा देण्याचे डॉ सुवर्णा यांनी  ठरविले होते. जेणेकरून जागतिक दर्जाचे ज्ञान आपल्या  देशातील व भागातील पेशंटला मिळू शकेल.यासाठी बिझी प्रॅक्टीस सांभाळून , सक्षम नारी या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सांभाळत व दररोज 6 ते 7 तास अभ्यास करने त्यांना आव्हानात्मक होते. परंतू  त्यांचे पती  डॉ. विक्रांत सोनार व शिवम पोहा च्या संचालिका मैत्रीण याची डॉ सुवर्णा यांना मोलाची साथ लाभली म्हणून त्यांच्या सौ सुनीता जोशी यांच्या मदतीने तसेच  सर्व मित्र, मैत्रिणी, परिवाराचे मिळालेले सहकार्य यामुळेच  ही अवघड परीक्षा पास केल्याच्या भावना डॉ सुवर्णा यांनी ” सातपुडा कन्या” शी बोलतांना व्यक्त केल्या   . सर्वांच्या शुभेच्छाबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहे . डॉ सुवर्णा गाडेकर यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल  त्यांचे राज्यासह  जिल्ह्य व शहरातील  सर्व स्तरातून तसेच मित्रमैत्रिणी व समाजातून अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .