भुसावळ : भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते उमाकांत उर्फ नमा शर्मा यांना शिवजयंती उत्सव समिती तर्फे भुसावळ येथे त्यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सामाजिक, पर्यावरण, राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना शिवभूषण पुरस्कार २०२४ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यानी गेल्या अनेक वर्षां पासुन सतत दरवर्षी शिवजयंतीसह परशुराम जयंती साजरी करणे गेल्या ७ वर्षांपासून सातत्याने शिववंदना घेणे , यासह विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा ८ मार्च महिला दिनी सन्मान करणे . तसेच वृक्षारोपण करणे, गरीब व गरजू महिलांना साडी वाटप , गरिबांना अन्नदान , विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप , खाऊ वाटप , करणे वृक्ष लावून वाढदिवस साजरे करणे गरीब विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप केले असे एक ना अनेक विविध कार्य केले त्याची दखल घेऊन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मुकेश गुंजाळ, उपाध्यक्ष मिलिंद कापडे ,राजेश भोई ,राहुल तायडे , पवन पाटील, हर्षल पाटील, दलजीत चौधरी, पंकज हिंगणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भुसावळ येथे शिवभूषण पुरस्कार २०२४ शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



