फिर्यादी पंकज लोखंडे यांची नार्कोटेस्ट करावी – केदार सानप :


भुसावळ – जळगाव जिल्हा पोलिस ठाणे येथे संगायो तहसीलदार नंदुरबार पंकज प्रेमचंद लोखंडे यांनी दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून एफ आय आर क्र. 51/2024 नुसार आरोपी गजानन नरोटे याच्याविरूध्द भा.दं.वि. 420, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने सत्यता पडताळणीकामी गुन्ह्यातील फिर्यादी तहसीलदार पंकज लोखंडे यांची नार्कोटेस्ट व बे्रन मॅपिंग करावी, याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक यांना अर्ज दिला आहे. गुन्ह्यातील आरोपी गजानन नरोटे याच्यावर अन्याय होणार नाही या अनुशंगाने तपास अधिकारी यांना योग्य ते चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती देखील अर्जात करण्यात आली आहे.