वरणगाव – वरणगाव गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्या सोबत हुज्जत घालून त्यांना धमकावत सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भरत चौधरी , सहाय्यक फैजदार ईस्माईल शेख (चालक) पो हे कॉ अतुल बोदडे हे मुक्ताईनगर उप विभागीय कार्यालयात जाऊन गाडी क्र एम एच १९ सी डी ८५९२ या शासकीय वाहनाने वरणगाव कडे परत येऊन शहरात गस्त घालीत असताना शहरातील रहिवाशी निजाम शे कलीमोद्दीन शेख हा सोनार गल्लीत रात्रीच्या साडे अकरा वाजेच्या सुमारास स्वतः ची ओळख लपवून तोंडावर रुमाल बांधून संशयीतरित्या मोटर सायकलीवर फिरत असलेल्या एका तरुणास थांबवून त्याला तोंडावरून रुमाल काढण्यास सांगून ऐवढया रात्री का फिरत आहे असा जाब विचारल्याचा राग मनात ठेवून तुम्ही मला थांबवू शकत नाही , तुम्ही मला का थांबवता आहे , गाव माझे आहे मी कुठेही फिरू शकतो असे म्हटला पोलीस गाडीतून खाली उतरुन त्याला समजविण्याचा प्रयत्न करीत असताना थांबा तुमचा बेतच पाहतो तुमची पोलीस कट्रोला बदलीच करतो असे म्हणत चालक इस्माईल शेख यांना धक्काबुक्की करीत शासकिय वाहनाच्या गाडीचे नुकसान करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आराडा ओरडा करून गल्लीत गर्दी जमवून झटापटी करीत त्याच्या सोबतचा तोसिफ शेख फरिद शेख व इतर तीन अनोळखी इसामानी बेकादेशीर जमाव जमवून निजाम शेख याला बेकादेशिर कृत्य करण्यासाठी मदत केल्याबद्दल सदर तरुणा विरोधात चालक इस्माईल शेख यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम ३५४ , १४३ , १४५ , १४७ , १४९ , ५०६ प्रमाणे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे


