रावेर - रावेर - यावल विधानसभा मतदारसंघ प्रहार जनशक्ती पक्ष प्रवेश सोहळा व पदाधिकारी बैठकीचे आयोजन दिनांक 02 फेब्रुवारी रोजी यावल तालुक्यातील न्हावी येथे दुपारी 2 . 30 वाजता दुर्गा देवी हॉल, ग्रामीण रुग्णालया शेजारी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रहारचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिल चौधरी मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व प्रहारसेवक, शेतकरी आघाडी, दिव्यांग आघाडी, युवक आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, महिला आघाडी, रुग्णसेवक, सोशल मिडिया सेल व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे .



