भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए . पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. व्ही . पाटील, प्रा डॉ. ए. डी . गोस्वामी, प्रा डॉ. जे एफ पाटील, प्रा डॉ. व्हि. एस . सोळुंके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. जे.एफ. पाटील यांनी केले. वाचनातून विद्यार्थी घडत असतात , विचारवंतांना ऐकण्याची संधी मिळते,वाचनाची प्रेरणा मिळत असते.अफाट वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते त्यासाठी किमान रोज वाचन केलेच पाहिजे असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर . एस. नाडेकर यांनी आपल्या भाषणातून वाचनाचे महत्व पटवून दिले.’वाचनाने घडतो माणूस ‘ या विषयांतर्गत वाचनातून निर्माण झालेली संस्कृती कुठेतरी लयास जात असल्याचे सांगितले . वाचन म्हणजे व्यवहारातून आपल्या ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. काव्याचा रसास्वाद आपल्याला घेता आला पाहिजे .कलात्मक मनोरंजक भाषेतून आपण वाचनाकडे पाहिले पाहिजे.आपल्या संस्कारांची नीती मूल्यांची वाढ वाचनातून झाली पाहिजे.कवितेचा रसास्वाद घेता आला पाहिजे .वाचन आपली गरज बनली पाहिजे. वाचन हे पदवी पुरते नसावे तर वाचनातून आनंद प्राप्ती झाली पाहिजे.वाचनाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि रुसोचे देखील उदाहरण सांगितले. एकविसाव्या शतकात माहितीचा भस्मासुर आहे .वाचन हे रसिकता निर्माण करणारे व सृजनशीलता निर्माण करणारे असावे.वाचन रसिकता निर्माण करणारे व सृजननशीलता निर्माण करणारे एक प्रमुख साधन आहे. असेही आपल्या मनोगतातून सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य .डॉ.एस.व्ही. पाटील यांनी ज्ञान वृद्धिंगत व जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन केलेचे पाहिजे. वाचनाची त्रिसूत्री, शब्दसंग्रह वाढविण्याची कला, पेपर वाचणे या सर्व गोष्टी वाचनातून साध्य होतात. वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाचनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा हेतू त्यामागे असतो. ‘अग्निपंख ‘ वाचल्यावर त्यातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते. वाचनाची परंपरा असलेला आपला भारत देश आहे.विद्यार्थ्यांचा शब्द संग्रह वाढावा यासाठी त्यांनी शब्दकोडी, विविध वृत्तपत्र , आत्मचरित्र -चरित्र , कादंबरी यांसारख्या वाचनातून खूप काही प्रेरणा मिळते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम महाजन तर आभार प्रा.वंदना महाजन यांनी मानले. मराठी विभागातील जेष्ठ प्रा. डॉ. के.के. अहिरे, प्रा. डॉ . दिनानाथ पाठक, प्रा. गौतम भालेराव, डॉ. स्वाती महाजन यांनी कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमास प्रा.डॉ. एस.टी. धूम, प्रा.डॉ. किरण वारके, प्रा. डॉ. पी.ए. अहिरे, प्रा. डॉ. डी. एम.टेकाडे, प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले , प्रा सचिन राजपूत ,डॉ. ममताबेन पाटील, डॉ. स्मिता चौधरी, प्रा. संगिता भिरुड,प्रा.अक्षरा साबळे, प्रा.शितल सोनवणे, प्रा. प्रतिभा गलवाडे प्रा. योगिता भंगाळे उपस्थित होत्या. महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.



