स्वातंत्र्याचे अस्तीत्व टिकवीणे आपली जबाबदारी – आ सावकारे

वरणगाव – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकानी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवीले आहे यांचा सन्मान राखत असताना तो एक दिवसा पुरता मर्यादित न राहता त्यांचे अस्तीत्व टिकवीणे हि आपली जबाबदारी असल्याचे मत आ संजय सावकारे यांनी वरणगाव नगर परिषदेच्या “मेरी माटी मेरा देश ” या अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलताना वक्त केले

“मेरी माटी मेरा देश ” या अंतर्गत मिट्टी को नमन , विरो का वंदन हे अभियान राबविण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यात दि १० ऑगस्ट रोजी महात्मा ज्योतीराव फुले सभागृहात माती , शेणखत याचे मिश्रण तयार करून त्यात विविध प्रकारच्या झाडाचे बी टाकुन त्यांचा गोळा तयार करण्याची ( सीड बॉल ) कार्यशाळेचे आयोजन करुण त्यात सुमारे सात हजारा पेक्षा जास्त गोळे (सीड बॉल ) तयार करण्यात आले होते तर दि १४ रोजी नगर परिषद कार्यालया पासून ते मच्छिंद्र नगर पर्यत वृक्ष दिंडी व तिरंगा ध्वज यात्रा व काढण्यात आली होती

मच्छिंद्र नगरच्या बगीचा आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते शिलाफलकाचा अनावरण करण्यात येऊन महापुरुषांच्या प्रतिमेस मला आपण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी माजी सैनिकांचा आमदार संजय सावकार यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी बोलताना आ सावकारे यांनी आपल्याला स्वातत्र्य मिळाले नाही त्यासाठी लाखोनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आजचा दिवस विभाजन व विभीसनाचा दिवस आहे एकीकडे देश स्वातंत्र्य झाल्याचा आनंद मात्र त्याच बरोबर देशाचे विभाजन झाल्याचे दु :ख आपल्या असून हे नागरिकांना सागण्याची वेळ आहे 0देशाने आपल्याला काय दिले त्यापेक्षा आपण देशाला काय देतो देशाला देण्याचे शिकले पाहीजे तर देश सपन्न होईल तरच देश अखंड व बालढय राहील
विभाजना मुळे आज आपण एकामेकांशी भांडत आहेत याचा फायदा शेजारील देश घेत आहे त्यासाठी एक संघ राहुल ज्या प्रमाणे सैनिक सीमेवर देशासाठी लढत आहे तशाच प्रमाणे आपण देशाचा सन्मान बाळगला पाहिजे असे मत आ सावकारे यांनी व्यक्त केले
या निमीत्त माजी सैनिकाच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली
यावेळी मंचावर प्रशासक प्रांतधिकारी जितेंद्र पाटील सह पो निरिक्षक आशिष आडसुळ , माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी , सुनिल काळे , नगर सेवीका अरुणाबाई इंगळे , वैशाली देशमूख आदी प्रमुख उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी शे समीर यांनी केले तर सुत्र संचालन निशांत नागरे यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी नगर परिषद कार्मचारी वृदानी परिश्रम घेतले